पूर्णा येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा 64 वा जन्मदिन आणि नागरी सत्कार सोहळ्यात सहभाग…. भीमप्रकाश गायकवाड

टीम नालंदाच्या वतीने भीमप्रकाश गायकवाड यांनी मनोगतात नालंदा आणि पूज्य भदंत यांचं असलेलं अतूट नातं याविषयी मन मोकळं करून शुभेच्छा दिल्या. टीममध्ये नालंदा विपश्यना केंद्र समितीचे अध्यक्ष करण गायकवाड, सह कोषाध्यक्ष भा ना इंगळे, स्वागताध्यक्ष गुणाजी पाचपुंजे यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे खास या सोहळ्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण मोरे सर पूण्याहून आले होते. त्यांनी नालंदाच्या वाटचालीवर समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सोबतच काही आत्मीय सूचना देऊन तुम्ही खूप पुढे जाणार अशा आश्वासक भावना व्यक्त केल्या.
या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित होते . सर्वांसोबत एकमेकास हितगुज करता आलं.
एका अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रमात सहभागी होऊन पूज्य भदंतेजींना शुभेच्छा देण्यात आल्या.
*भीमप्रकाश गायकवाड, सचिव,नालंदा विपश्यना केंद्र समिती, परभणी