*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड

Share:

काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड

सूरज गायकवाड म्हणतात की “काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करून त्यांना समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम बनवतात. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे मार्गदर्शक आदरणीय सुदीपजी गायकवाड साहेब!
आमच्या सारख्या कार्यकर्त्याचे नेतृत्व घडविण्यामध्ये साहेबांचा मोलाचा वाटा आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना कोणत्या बारीकसारीक गोष्टींची काळजी घ्यावी, लोकांशी संवाद कसा साधावा, संघटनात्मक काम कसे करावे आणि नेतृत्वाची जबाबदारी कशी पार पाडावी, याचे बहुमोल धडे मला साहेबांकडून मिळाले.
कार्यकर्ते घडविणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना सक्षम नेतृत्वाच्या दिशेने घेऊन जाणे, हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असते!
साहेब, आपण माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना दिलेले मार्गदर्शन, शिकवलेली शिस्त आणि विचारांची दिलेली दिशा ही आयुष्यभरासाठी मोलाची शिदोरी आहे.
आपल्यासारख्या अनुभवी, निस्वार्थी आणि कार्यकर्त्यांच्या जडणघडणीसाठी समर्पित असलेल्या मार्गदर्शकाचे सान्निध्य लाभणे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीत उत्तरोत्तर यश लाभो. आपल्या मार्गदर्शनातून अनेक सक्षम नेतृत्वे घडोत आणि आपल्या कार्याचा गौरव सर्वदूर पोहोचो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! आपल्या कार्याला आणि नेतृत्वाला मानाचा मुजरा! नेतृत्व घडविणारे नेतृत्व… आदरणीय सुदीपजी गायकवाड साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.”

जय भीम! जय भारत!
शुभेच्छुक :-
सुरज चंद्रकांत गायकवाड
(सामाजिक कार्यकर्ता व शहराध्यक्ष, भिमशक्ती सामाजिक संघटना पिंपरी चिंचवड शहर)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*