बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा

*पुणे, ३१ ऑक्टोबर २०२६ :* बिबवेवाडी परिसरातील नीलकमल सोसायटी आणि शिवशंकर सोसायटी येथे गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे, विशेषतः महिलांचे प्रचंड हाल होत आहेत.

या समस्येवर तातडीने उपाय काढावा या मागणीसाठी आज दोन्ही सोसायटीतील महिला एकत्र येऊन नगरसेवक शिळीमकर, मानसी देशपांडे आणि दिवेकर यांची भेट घेतली. यावेळी महिलांनी आपल्या व्यथा मांडत प्रशासनाने लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.

पाणी टंचाईमुळे दैनंदिन कामे खोळंबली असून टँकर मागवावे लागत आहेत, ज्यामुळे आर्थिक भारही वाढत आहे. नगरसेवकांनी या प्रकरणी लक्ष घालून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
*स्थळ: बिबवेवाडी, पुणे*
*वार्ताहर: स्वतंत्र पुणे न्यूज*
