*धम्मचक्र प्रवर्तन दिन 70 वा उत्साहात संपन्न… परभणीत जनसागर उसळला!*

*परभणी – दि. 02/10/2026*
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारतीय बौद्ध महासभा आणि राजगृह ब्रिगेडच्या वतीने अभिनव महावंदनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष *पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो* यांच्यासह पूज्य भिक्खू संघाची उपस्थिती लाभली. हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी स्वयंस्फूर्तपणे या सोहळ्यात सहभागी झाले होते.
एवढ्या प्रचंड गर्दीत चार सच्चा सहपथिकांची भेट झाली –
*एक -* समाजभूषण डॉ भीमराव हत्तीअंबिरे संस्थापक अध्यक्ष
दोन -महाराष्ट्रात नावारुपास आलेल्या संबोधी अकादमी महाराष्ट्रचे सचिव *शेषराव जल्हारे*. आंबेडकरी चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता… प्रचंड अनुभव असलेला … अनेक उन्हाळे-पावसाळे पाहून त्यांना लीलया पचवत वाटचाल करणारा निगर्वी भीमसैनिक!
*तीन -* *उत्तम बोरसुरीकर*. उपजत न्यूज सेंस असलेल्या माझ्या पहाण्यातील महाराष्ट्रातील परिपूर्ण प्रेस फोटोग्राफर्स पैकी एक असलेला परभणीचा स्वाभिमानी बंदा!
*चार -* *स्वप्निल बोर्डे*. नव्या पिढीतील अभ्यासू अजातशत्रू, तरुणांना जोडणारा कुशल संघटक!
*रिपोर्ट: स्वतंत्र पुणे न्यूज – संपादक विशाल महादेव खुने*
