*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

*महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना*

Share:

*महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना*

पुणे, दि. ३० ऑक्टोबर २०२६ : पुणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीनिमित्त बोनस देण्यात यावा, अशी सूचना पुणे महापालिकेचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी आज झालेल्या पक्षनेते सभेत केली.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात या कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून, त्यांच्याही कष्टांचा आणि सेवाभावाचा विचार प्रशासनाने करणे आवश्यक आहे, असे मत उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केले.

आज पुणे महानगरपालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत पाच वर्षांचा करार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही विचार करून त्यांनाही दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी सूचना उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी मांडली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे दिवाळी बोनस दिला जातो, त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिवाळी हा आनंदाचा आणि सणासुदीचा काळ असून, महापालिकेत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कर्मचारीदेखील शहराच्या सेवेसाठी योगदान देत असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचाही दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा, या मानवतावादी दृष्टिकोनातून प्रशासनाने या सूचनेचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन मा. परशुराम वाडेकर यांनी केले.

महापालिकेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळावा आणि त्यांच्याप्रती प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

*उपमहापौर कार्यालय पुणे महानगरपालिका*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*