*सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला, बोपोडी येथील क्रीडांगण व परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण; शिक्षक व पालकांकडून उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सत्कार* *महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस द्यावा; उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांची पक्षनेते सभेत सूचना* *पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने* *बिबवेवाडीतील नीलकमल आणि शिवशंकर सोसायटीत भीषण पाणी टंचाई; महिलांचा नगरसेवकांना घेराव चर्चा * काही व्यक्ती केवळ स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तर इतरांच्या अंगी नेतृत्वगुण निर्माण करतात….. सूरज गायकवाड वाल्मीकि समाज के परिवार के साथ किए गए हमलों व मारपीट की निदा की और हमला वरो के विरुद्ध क़ानूनी कार्रवाई कराने की मांग अरविन्द झंझोट

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

Share:

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

पिपळे सौदागर 14 ऑकटो:- क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल रहाटणी पुणे येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भालेराव यांनी केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मित्र मंडळ चे अध्यक्ष शांताराम भालेराव, नवयुग वितरक चे विवेक छेडा, मिलिंद निसर्गगंध व विद्या भालेराव तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी निशा मॅडम यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आणि बौद्ध धर्माच्या शिकवणुकीची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शांती, समता, न्याय आणि मानवता या मानवी मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा दिली. भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसा, स्वातंत्र्य, करुणा, बंधुता आणि समानतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनात चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भगवान गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करून ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*