*भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे माता रमाई आंबेडकर रोड वार्ड शाखेचे कार्याध्यक्ष तक्षशिला बुद्ध विहाराचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब सोनवणे यांचा आनंदी उत्साही वातावरनात वाढदिवस साजरा… निलेश गायकवाड*
आयु बाबासाहेब सोनावने सर गेल्या वीस ते पंचवीस कार्यात आहेत.
सोनावने यांच्या बद्दल कार्यक्रम स्थळी बोलताना निलेश गायकवाड म्हणाले की “आयु बाबासाहेब सोनावने सर गेल्या विस ते पंचवीस वर्षापासून सातत्याने धार्मिक कार्यामध्ये अग्रगण्य असणारे नेतृत्व,ज्यांच्याकडे पाहून असंख्य तरुण धम्म कार्यात कार्यरत आहेत, आपण जीवनामध्ये जे क्षेत्र निवडत असतो त्या क्षेत्रामध्येच कायमस्वरूपी राहिले पाहिजे याच उद्देशाने बाबासाहेब सोनवणे फक्त धार्मिक कार्य आमच्या भागामध्ये करत असतात कोणत्याही पद्धतीचे राजकारण किंवा राजकीय लोकांना हाताशी धरून कधीच कोणतेच कार्य त्यांनी केलेले नाही हे सर्व पाहत आलेलो आहोत, बाबासाहेब सोनवणे हे तक्षशिला बुद्ध विहार मोडकळीस होते तेव्हापासून ते आजतागायत विहार आज सुसज्ज देखणं निर्माण झालेल आहे,विहारामध्ये सातत्याने धार्मिक संस्कार विधी व समाज उपयोगी उपक्रम होत आहेत त्यामध्ये बाबाचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे विशेषता कोणत्याही पद प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता आमच्याबरोबर अर्थात भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेबरोबर कार्यरत आहेत त्यांच्या कार्याला अशीच सद्गती मिळो त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्णतत्त्वास जाओ हीच मनोभावे इच्छा” असे म्हणाले आणि बाबासाहेब सोनवणे यांना भिम छावा संघटनेच्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.