- वंचित बहुजन आघाडी आगामी विधान परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढत असून, त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात प्रा. सोमनाथ साळुंखे आणि शिक्षक मतदारसंघात डॉ. आय. सी. शेख यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
