भीमशक्ती सामाजिक संघटनेचा ‘रेम्बो डेव्हलपर्स’ला जोरदार दणका
अजिंठा नगर आकुर्डी येथील १०० झोपडीधारकांवरील बेकायदेशीर कारवाई भीमशक्तीने काडली मोडीत
बिल्डरशाहीचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही
कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता, आकुर्डी येथील अजिंठा नगर ‘C’ पत्रा शेड शेजारील १०० गरीब झोपडीधारकांना बेघर करण्याचा डाव ‘रेम्बो डेव्हलपर्स’च्या विकासकाने आखला होता. हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक कारभार समोर येताच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे खंबीर नेतृत्व सुरजभाऊ गायकवाड आणि युवा अध्यक्ष अक्षयभैया कसबे (पिंपरी-चिंचवड शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने तात्काळ आक्रमक भूमिका घेतली
SRA प्रशासनाकडून कारवाईला तात्काळ स्थगिती
सुरजभाऊ गायकवाड, युवा अध्यक्ष अक्षयभैया कसबे आणि संघटनेच्या वतीने आज थेट ‘SRA’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) माननीय खडके साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आणि या गंभीर अन्यायाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
भीमशक्तीच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाला झुकावेच लागले
CEO खडके साहेबांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत ‘रेम्बो डेव्हलपर्स’च्या विकासकाला थेट फोन लावून कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आधी सर्व झोपडीधारकांना पात्र करा आणि त्यानंतरच त्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित करा असे स्पष्ट निर्देश विकासकाला दिले आहेत.
लढा अजून संपलेला नाही
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि नागरिकांची बाजू प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी CEO खडके साहेबांनी सुरजभाऊ गायकवाड, युवा अध्यक्ष अक्षयभैया कसबे आणि भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांसह येत्या शुक्रवारी अजिंठा नगरमधील झोपडीधारकांना प्रत्यक्ष भेट देण्याचे मान्य केले आहे.
गोरगरिबांच्या हक्कासाठी, त्यांच्या हक्काच्या छतासाठी भीमशक्ती सामाजिक संघटना सदैव कटिबद्ध आहे अन्याय करणाऱ्या बिल्डरांना जशास तसे उत्तर दिले जाईल
सुरजभाऊ गायकवाड
अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर भीमशक्ती सामाजिक संघटना
अक्षयभैया कसबे
युवा अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर भीमशक्ती सामाजिक संघटना
भीमशक्ती सामाजिक संघटना सदैव जनहितासाठी तत्पर
