*पुणे जिल्ह्यातील अनोखा रिक्षा चालक – हिरव्या रिक्षातून सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसार*पुण्यातील एकमेव ‘धम्मरथ’ – रिक्षात फुलवली हिरवी बाग, १८ वर्षांपासून धम्म आणि सामाजिक कार्यात अग्रेसर – राम माने*

*पुणे, पिम्परी चिंचवड :* शहरात धावणाऱ्या हजारो रिक्षांमध्ये एक रिक्षा अशी आहे की जी बघताच मन प्रसन्न होते. ही आहे रिक्षा चालक *राम माने* यांची प्रसिद्ध *’हिरवी रिक्षा उर्फ धम्मरथ’*रिक्षा नाही, फिरती बागच!*
राम माने यांनी आपल्या रिक्षामध्ये ८-१० कुंड्यांमध्ये झाडे लावली आहेत. मनी प्लांट सारख्या वेली रिक्षाच्या छतावरून लटकत आहेत. आतमध्ये कृत्रिम हिरवे गवत, स्वच्छ बैठक व्यवस्था आणि समोर भगवान बुद्धांच्या आणि हत्तींच्या सुंदर मूर्त्या ठेवल्या आहेत. पुण्यात अशी सजवलेली एकमेव रिक्षा असल्याचे ते माने सांगतात.

*रिक्षातून धम्माचा प्रचार*
राम माने फक्त रिक्षा चालवत नाहीत, तर रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगतात. “मी रिक्षामध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला धम्माचं आणि बाबासाहेबांचं महत्व पटवून देतो. भगवान बुद्ध हे मानव कल्याणासाठी आहेत, एका जाती-धर्मासाठी नाही.”
ते समाज बांधवांना विहारात जाण्यासाठी *फ्री रिक्षा सेवा* देखील देतात.
*त्यांनी रिक्षा चालकांसाठी योजना*
गेल्या १८ वर्षांपासून समाजकार्य करत असल्याचे सांगत राम माने यांनी रिक्षा चालकांसाठी एक कंपनी स्थापन केली आहे – *दहा कोटी सोशल बुद्धिस्ट ग्रुप अँड ज्ञानरुपी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी.*
– गरजू रिक्षा चालकास मेंटेनन्ससाठी १०,००० रु. देणार
या कंपनीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन-ऑफलाईन उपलब्ध करून देणे आणि उद्योग क्षेत्रात मोठे कार्य करणे हा त्यांचा मानस आहे.
पिम्परी चिंचवड आणी पुण्यातील परिसरात एक अनोखी ऑटो रिक्षा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही रिक्षा आहे राम माने यांची. त्यांची रिक्षा फक्त प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाही, तर सामाजिक संदेश आणि पर्यावरण प्रेमाचा प्रसारही करते.

राम माने यांनी आपल्या रिक्षामध्ये छोटीशी बागच फुलवली आहे. रिक्षामध्ये कुंड्यांमध्ये लावलेली हिरवीगार झाडे, कृत्रिम गवत आणि स्वच्छता पाहून प्रवाशांना एक वेगळाच आनंद आणि शांतता मिळते. प्रदूषणाच्या काळात त्यांनी पर्यावरण जपण्याचा हा अनोखा प्रयत्न सुरू केला आहे.
फक्त पर्यावरणच नाही, तर राम माने हे रिक्षाच्या माध्यमातून *सामाजिक कल्याण आणि धम्म प्रसाराचे* कार्य देखील करतात. ते प्रवाशांशी माणुसकी, समता आणि करुणेच्या गोष्टी बोलतात. गरजू लोकांना मदत करणे, सामाजिक प्रबोधन करणे हा त्यांचा ध्यास आहे.
पोटासाठी रिक्षा चालवत असताना देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी हे कार्य सुरू ठेवले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात पैशाच्या मागे धावत असताना राम माने यांच्यासारखी माणसे समाजात प्रेरणा देणारी आहेत
रिक्षा चालवून आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि समाजासाठी झटणाऱ्या राम माने यांचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.
*राम माने संपर्क: 9049411929*
स्वतंत्र पुणे न्यूज परिवाराकडून राम माने यांच्या या कार्याला सलाम!
*- स्वतंत्र पुणे न्यूज टीम*

