*बुद्ध लेणी: तथागत गौतम बुद्धांचा चालता बोलता इतिहास !*

*अजिंठा लेणी / विशेष लेख – दि. 19/10/2026, सोमवार*
जागोजागी उजेडात आलेल्या… उजेडात येत असलेल्या भारतातील बुद्ध लेणी हा तथागत गौतम बुद्धांचा चालता बोलता इतिहास असून तो भल्याभल्यांना बोलतं करतो…
स्वातंत्र्य सेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान कन्नडने प्रकाशित केलेली ‘बुद्ध शिल्प विचार’ ही पितळखोरे लेणींवरील पुस्तिका 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आज पुन्हा एकदा वाचण्यासाठी घेतली आहे…
स्मृतिशेष भाऊसाहेब बी एस मोरे यांचे चिरंजीव तथा वरिष्ठ पोलिस अधिकारी *प्रवीण मोरे* यांनी ही पुस्तिका लिहिली आहे.
तथागत बुद्धानंतर त्यांचं मानवकल्याणकारी वैश्विक तत्वज्ञान जिवंत ठेवण्याचं काम हे लेणी आणि शिल्पांनी केलंय् हे आपण जाणतो. एवढेच नाही तर संशोधकांनाही ह्या शिल्प आणि लेण्यांनी बोलतं केलं आहे…!
*भारताची जगात ओळख बुद्धामुळेच होय !!*
प्रवीण मोरे सर म्हणतात-
“डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बुद्ध तत्वज्ञाने प्रभावित होते. समता व स्वातंत्र्य या मूल्यांना सर्वात उच्च स्थान केवळ बौद्ध धर्मात आहे, हे ते जाणून होते. त्यामुळे बुद्ध शिल्पांबाबत मोठे आकर्षण होते. समाज परिवर्तनाच्या संघर्षात त्यांचे औरंगाबाद येथे येणे होत असे. त्यावेळी त्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा व वेरूळ लेण्यांना भेटी दिल्या होत्या व भेटीत लेणींचे अधीक्षक देशपांडे व मराठवाड्याचे नेते भाऊसाहेब मोरे यांच्याकडून पितळखोरा लेण्यांचा इतिहास जाणून घेतला होता. रस्ता चांगला नसल्याने नंतर कधी तरी जायचे ठरले…”
वेरूळच्या लेण्यांपासून अवघ्या 45 कि.मी. अंतरावर असलेल्या पितळखो-याच्या लेण्या मी अद्याप पाहिल्या नाहीत याची खंत वाटते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
*”जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं इतिहास निर्माण करू शकत नाहीत !” – डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*लेखक: भीमप्रकाश गायकवाड,*
‘मूकनायक’, रविराज पार्क, परभणी