*बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा*
आयोजित संत गाडगेबाबा अकूल धर्म शाळेतील पुणे करार धिक्कार परिषदेचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
*कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय कॉर्डिनेटर तथा महाराष्ट्र कर्नाटक प्रदेशचे प्रभारी सन्माननीय दिनेश जी गौतम साहेब यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.*
*त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट सुनील जी डोंगरे यांनी पुणे कराराचे नुकसान कार्यकर्त्यांना समजून सांगितले आणि त्यातून काही लोक कसे फायदा घेतात हे सांगितले चमचे किती प्रकारचे असतात हे सुद्धा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.*
*त्याचबरोबर पुणे खानदेश झोनचे मुख्य निरीक्षक डॉक्टर रामचंद्र जाधव साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव किरणजी आल्हाट व महाराष्ट्र प्रदेशचे सचिव राजेश चव्हाण यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्ह्याचे *अध्यक्ष
अशोक दादा गायकवाड* यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्ह्याचे *महासचिव प्रवीण जी वाकोडे* यांनी केले त्यावेळी पुणे जिल्हा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर बूथ अध्यक्ष व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी
*कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.*
कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविणार्या सर्व कार्यकर्त्यांचे खुप खुप आभार